News Flash

महिला डॉक्टरकडून रुग्णांना इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला, तपासाचे आदेश

पंतप्रधानांना संकेतस्थळावरून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

राजस्थानच्या बिकानेरमधील एक डॉक्टर आजार बरा होण्यासाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा सल्ला देत असल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर जमीमा हयात विरुद्ध अनेक रुग्णांनी तक्रार केल्यानंतर सीएमएचओ डॉ. देवेंद्र चौधरी यांनी जमीमा हयातला असे न करण्यास सुनावले. परंतु, या महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष करत आपली प्रॅक्टिस सुरुच ठेवली. अलिकडेच त्यांना एक नोटीस जारी करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयातूनदेखील या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त असून, आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहेत. पंतप्रधानांना संकेतस्थळावरून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आपल्या आठ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी जमीमाकडे गेल्याचे मनीष सिंघल नावाच्या व्यक्तीने सांगितले. इस्लामचा स्वीकार केल्याने त्याच्या कुटूंबाच्या सर्व समस्या कशाप्रकारे दूर होतील ते जमीमाने त्यांना सांगितले. उपचारादरम्यान ती इस्लामिक वाक्येदेखील म्हणत होती. जमीमाच्या विरुद्ध या आधीदेखील अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या कारणाने अनेकवेळा तिची बदलीदेखील करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 5:28 pm

Web Title: rajasthan woman muslim doctor gets notice for advising patients to follow islam
टॅग : Doctor,Islam,Rajasthan
Next Stories
1 स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
2 PNB Bank: पंजाब नॅशनल बॅंकेला इतिहासातील सर्वांत मोठा तोटा
3 फोनवर व्यग्र असलेल्या पत्नीस लग्नानंतर काही मिनिटांत पतीने दिला ‘तलाक’!
Just Now!
X