News Flash

पतीसमोर विवाहितेवर बलात्कार; घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाचे कृत्य

हादरवून टाकणारी घटना

(संग्रहित छायाचित्र)

महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा राजकारणात उग्र होत असताना या घटनांचं सत्र मात्र सुरूच आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिला तिच्या कुटुंबासोबत घरी जात असताना आरोपीने चार जणांच्या मदतीने हे कृत्य केलं. राजस्थानातील बारण जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पीडित महिला दुसऱ्या पतीसह मुलगा आणि लहान बहिणीसह शनिवारी रात्री घरी जात होती. त्याचवेळी छाजवर गावाजवळ तिच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या भाऊ आणि चार जण त्यांना भेटले. त्यांनी पीडितेसह तिच्या कुटुंबियांना शेतात नेले. त्यानंतर तिच्या नवऱ्यावर हल्ला केला आणि त्याचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर पतीसमोरच आरोपीने महिलेवर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेंद्र सिंह यांनी दिली आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाला. त्यानंतर महिला पतीसह लहान मुल आणि बहिणीला घेऊन कशीबशी मुख्य रस्त्यावर आली. त्यानंतर त्यांनी जाणाऱ्या प्रवाशांना मदत मागितली. प्रवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अपहरण करणे आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, बलात्कार करणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक केली आहे. मुल होत नसल्याने पीडित महिला वयाच्या विशीमध्येच तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर महिलेनं पारंपरिक रुढी असलेल्या नाटा प्रथेनुसार दुसरं लग्न केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 11:56 am

Web Title: rajasthan woman raped by ex husbands brother in front of current husband bmh 90
Next Stories
1 समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही कारण ईश्वर वाईट गोष्टींना…; कॅथलिक चर्चचं स्पष्टीकरण
2 भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या? रेल्वे मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण
3 Video: रेंजर्सची गाडी जवळ आली अन्…; कराचीतील मोटरसायकल ब्लास्टचे CCTV फुटेज
Just Now!
X