News Flash

राजेंद्रसिंह राणा यांना ‘पाण्याचे नोबेल’ जाहीर

पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ या वर्षीसाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ उभे करणारे आणि जलपुरुष

| March 21, 2015 02:47 am

पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ या वर्षीसाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ उभे करणारे आणि जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे राजेंद्रसिंह राणा यांना जाहीर झाले आहे. त्यांना स्वीडनच्या राजाकडून येत्या २६ ऑगस्ट रोजी हे पारितोषक दिले जाणार आहे.
 यापूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे आणि  बिंदेश्वर पाठक या भारतीयांना हे पारितोषक मिळाले आहे.
‘जोहड’ ची निर्मिती
राजस्थानमध्ये हजारो ‘जोहड’ निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्रसिंह प्रसिद्धीस आले होते. त्यांनी ‘तरुण भारत संघ’ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये असे जोहड निर्माण केले.
अलीकडच्या काळात त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांत फिरून लोकांचे संघटन केले आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीला बळ दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 2:47 am

Web Title: rajendra singh the waterman of india awarded stockholm water prize
टॅग : Rajendra Singh
Next Stories
1 खाण व खनिज, कोळसा विधेयके राज्यसभेत मंजूर
2 डी.के. रवी आत्महत्या प्रकरणास वेगळे वळण?
3 भगवद्गीतेसंबंधी सुनावणीस नकार
Just Now!
X