दिल्लीच्या सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर एलईडी स्क्रीनवर अश्लील क्लिप चालवली गेल्यामुळे खळबळ उडाली. जाहिराती दाखवण्यासाठी असणाऱ्या एलईडी स्क्रीनवर काही काळासाठी क्लिप चालवली गेली. बहुतांश प्रवाशांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले परंतु काही प्रवाशांनी मात्र या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. या प्रकरणाची मेट्रोच्या प्रशासकांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. जाहिराती चालवता चालवता अनावधाने ऑपरेटरकडून चूक होऊन ही क्लिप चालवली गेली असावी असा अंदाज आहे. दोषींवर कारवाई होणार असल्याची ग्वाही मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

एलईडी स्क्रीन मेट्रो प्रशासनाद्वारे चालवली जात नाही असे मेट्रोच्या प्रवक्त्यांनी म्हटले. एलईडी स्क्रीनचे कंत्राट दिले जाते. संबंधित स्क्रीनची चाचणी घेतली जात होती. चाचणी घेत असताना अनवधानाने हा प्रकार झाला असू शकतो असे ते म्हणाले. असे असले तरी या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाणार आहे असे ते म्हणाले.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Metro 1 route soon to MMRDA Bankruptcy petition against MMOPL disposed
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

या प्रकरणाचे सोशल मिडियावर तीव्र पडसाद उमटले आहेत. मेट्रोच्या परिसरात अशा क्लिप दाखवलीच कशी जाऊ शकते असा प्रश्न एका जणाने विचारला आहे. तर, प्रवाशांना लज्जित करण्यासाठी कुणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असे एका जणाने म्हटले आहे. लंडनच्या मेट्रो स्टेशनवर देखील इतक्या सुविधा नसतील तितक्या सुविधा दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर आहेत असे एका जणाने उपरोधिकपणे म्हटले आहे. याआधी केरळमध्ये एका बस स्टॅंडवर पॉर्न क्लिप चालवली गेली होती. त्यामुळे बस स्टॅंडवर गोंधळ उडाला होता.