News Flash

काँग्रेस, गांधी परिवार तुमच्या पाठीशी…!

परिवाराने श्रीमती सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

सातव परिवाराला सोनिया, राहुल गांधी यांची ग्वाही

नांदेड : राजीव सातव हे आमच्यासाठी निकटचे सहकारी आणि पारिवारिक सदस्य होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आपण सारे पोरके झालो असून अशाप्रसंगी तसेच भविष्यातही गांधी परिवार आणि काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही काँग्रेस पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी तसेच खा. राहुल गांधी यांनी सातव परिवाराला दिल्लीतील भेटीमध्ये दिली.

राजीव सातव यांच्या निधनाला एक महिना पूर्ण होण्याच्या सुमारास त्यांच्या मातोश्री, माजी मंत्री रजनीताई, पत्नी डॉ. प्रज्ञा आणि दोन मुले हा परिवार राजधानी दिल्लीत पोहोचला.  परिवाराने श्रीमती सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ‘राजीव सातव यांना मी कधीच नावाने बोलले नाही. सातव या आडनावाचा उल्लेख करून बोलत होते,’ असे सांगून सोनियांनी अनेक प्रसंग-आठवणींना उजाळा दिला. रजनीताई आणि प्रज्ञा सातव यांना वारंवार धीर देत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. या दोघी तेथून निघण्यापूर्वी सोनिया यांनी स्वत:चा व्यक्तिगत संपर्क क्रमांक त्यांच्याकडे दिला. गरज पडल्यास केव्हाही संपर्क साधा, असेही त्यांनी सांगितले.

या भेटीनंतर खासदार राहुल गांधी यांच्याशीही त्यांची भेट झाली. राजीव मला भावासमान होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची आणि माझी व्यक्तिगत हानी झाल्याची भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:13 am

Web Title: rajiv satav death congress party president sonia gandhi rahul gandhi akp 94
Next Stories
1 काश्मीरमधील १४ नेत्यांना केंद्राचे  बैठकीसाठी आमंत्रण
2 ब्रिटनमध्ये तिसरी लाट; लसीकरणावर भर
3 आसाममध्ये लाभार्थींसाठी दोन अपत्ये धोरण
Just Now!
X