चीनचे बऱ्यापैकी सैन्य पूर्व लडाख भागाकडे हलवले असून भारत या परिस्थितीवर आवश्यक उपाययोजना करीत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांच्या लष्करात महिनाभरापासून तिढा निर्माण झाला असून चीनने पूर्व लडाखवर नेहमीच दावा केला आहे त्याबाबत त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत ही माहिती दिली.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, वरिष्ठ भारतीय व चिनी लष्करी अधिकारी यांच्यात ६ जून रोजी बैठक होणार असून भारत आपल्या भूमिकेवर माघार घेणार नाही.