News Flash

जबरदस्त! DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या लॅबमुळे Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे.

करोना व्हायरसविरोधात अनेक सरकारी संस्था आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. DRDO अशाच संस्थांपैकी एक आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे. डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.

“करोना व्हायरसच्या चाचणीचे दिवसाला १ हजार नमुने तपासण्याची या लॅबची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही लॅब उभी करण्यात आली आहे” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 6:19 pm

Web Title: rajnath singh unveils drdo powered mobile lab to speed up covid 19 screening dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाशी लढा : वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना १० लाखांच्या विम्याचं कवच
2 ना लॉकडाउन…ना सोशल डिस्टन्सिंग, करोनाशी लढण्याची ‘ही’ आहे स्वीडनची स्ट्रॅटेजी
3 Good news: मागच्या १४ दिवसात ७८ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण नाही
Just Now!
X