News Flash

इतरांपेक्षा यादव आणि राजपूत जास्त दारु पितात, मंत्र्याचेे धक्कादायक विधान

इतरांपेक्षा राजपूत आणि यादव जास्त दारु पितात असे वादग्रस्त विधान करणारे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या निवासस्थानावर शनिवारी आंदोलकांनी टोमॅटो आणि अंडी

राजभर हे योगी सरकारमध्ये मंत्री असून सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. भाजपाबरोबर त्यांची युती आहे. (संग्रहित छायाचित्र)

इतरांपेक्षा राजपूत आणि यादव जास्त दारु पितात असे वादग्रस्त विधान करणारे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या निवासस्थानावर शनिवारी आंदोलकांनी टोमॅटो आणि अंडी फेकून मारली. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते  आज दुपारी राजभर यांच्या हजरतगंज येथील अधिकृत निवासस्थानी धडकले. त्यांनी राजभर यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन दरवाजावरच्या नावाच्या पाटीचे नुकसान केले.

दारु पिण्याच्या सवयीवर बोलताना शुक्रवारी राजभर यांनी वाराणसीमध्ये हे वक्तव्य केले होते. दारु पिण्याच्या बाबतीत राजभर समाजाच्या लोकांना सर्वाधिक दोष दिला जातो. पण सर्वाधिक दारु राजपूत आणि यादवच पितात असे विधान ओम प्रकाश राजभर यांनी केले होते. यादव आणि राजपूतांना दोष देतानाच त्यांनी आपल्या स्वत:च्या राजभर तसेच अन्य जातीचे लोकही दारु पितात असेही ते म्हणाले होते.

दारु पिऊन आल्यावर काय त्रास होतो हे तुम्हाला आई, बहिण किंवा पत्नीच सांगू शकते असे राजभर म्हणाले होते. ओम प्रकाश राजभर हे भाजपाचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय पार्टीच्या कोटयातून मंत्री झाले आहेत. याआधी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवरुनही त्यांनी वाद निर्माण केला आहे. राज्यातील भाजपा सरकारने एकही चांगलं काम केलेलं नाही. काँग्रेस सरकारला कंटाळून जनतेने ज्याप्रकारे पर्याय म्हणून मोदींना निवडलं, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील जनता पर्याय शोधेल असं ओम प्रकाश राजभर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2018 6:38 pm

Web Title: rajputs and yadavs drink more liquor than others
Next Stories
1 जियोला ‘रग्गड’ फायदा तर आयडियाला तिप्पट नुकसान
2 पाकिस्तानकडे दुर्लक्ष करुन जिनपिंग आणि मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3 पुन्हा डोकलाम टाळण्यासाठी नरेंद्र मोदी-जिनपिंग भेटीमध्ये ठरला हा ‘फॉर्म्युला’
Just Now!
X