03 December 2020

News Flash

लव्ह जिहाद नव्हे तर अनैतिक संबंध लपवण्यासाठी मजुराला जिवंत जाळले

अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुस्लिम मजुराची हत्या

शंभूलालविरोधात जानेवारीमध्येच ४०० पानी आरोपपत्र दाखल झाले असून सध्या तो जोधपूरमधील मध्यवर्ती तुरुंगात आहे.

राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका मजुराला जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हे सगळे प्रकरण लव्ह जिहादमधून घडले होते असेही तेव्हा समोर आले होते. मात्र आता या प्रकरणातील मुख्य आरोपी शंभूलाल रैगरने त्याचे अनैतिक संबंध लपवण्यासाठीच मुस्लिम मजुराची हत्या करून हे सगळे प्रकरण लव्ह जिहादचा सूड असल्याचा कांगावा केला होता. अशी माहिती राजस्थान पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये नमूद केली आहे.

राजसमंद जिल्हा न्यायालयासमोर ४०० पानी चार्जशीट ठेवण्यात आली. या चार्जशीटमध्ये शंभूलालची पत्नी आणि त्याची प्रेयसी नर्स या दोघींना साक्षीदार करण्यात आले आहे. आरोपी शंभूलाल हा पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम मजुराला शेतात घेऊन गेला त्यानंतर त्याने कुऱ्हाडीचे वार केले. तो जखमी अवस्थेत तडफडत असतानाच शंभूलालने त्याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि या मजुराला जिवंत जाळले. या घटनेत मजुराचा मृत्यू झाला.

एवढेच नाही तर क्रौर्याचा कळस म्हणजे शंभूलालने या सगळ्या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोडही केला. जिहादी लोकांनी आमच्या देशातून बाहेर जावे अशा घोषणा शंभूलाल देत होता हे देखील व्हिडिओत रेकॉर्ड झाले आहे. या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. तसेच शंभूलालच्या विरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हाही नोंदवण्यात आला. ही हत्या करण्याआधी शंभूलालने साधारण वर्षभर आधी त्याच्या १५ वर्षीय भाच्यासमोर काही कोंबड्या आणि बकऱ्या कापल्या. धर्मानुसारच मी हे करतो आहे असे त्याने त्याच्या भाच्याला सांगितले. १५ वर्षांच्या भाच्याने या कृत्याचाही व्हिडिओ शूट केला होता. शंभूलाल आणि त्याचा भाचा या ठिकाणी सहावेळा आले होते अशीही माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली होती.

मुस्लिम मजुराला जिवंत जाळून त्याची हत्या करण्याआधी शंभूलालने हिंदू कट्टरपंथिय, जम्मू काश्मीरचे दहशतवादी आणि मुस्लिम यांच्यासंदर्भातील काही व्हिडिओ क्लिप पाहिल्या होत्या असेही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपी शंभूलाने प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून व्हिडिओ अपलोड केले होते. धर्माच्या नावे हत्या करून तो दक्षिणेत प्रसिद्ध होऊ पाहात होता अशी माहिती उदयपूरचे आयजी आनंद श्रीवास्तव यांनी दिली.

तर शंभूलालची पत्नी सीता आणि एका ५० वर्षीय महिलेचा वाद सुरु होता. त्या महिलेच्या मुलीसोबत शंभूलालचे अनैतिक संबंध होते. या मुलीला सुमारे १० महिने शंभूलालने डांबून ठेवले होते अशीही माहिती त्याच्या पत्नीने दिली. यासाठी त्याला १० हजारांचा दंडही भरावा लागला होता. अशीही माहिती त्याच्या पत्नीने दिली. हे सगळे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र शंभूलालने हे सगळे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. लव्ह जिहादचा कांगावा शंभूलालने त्याचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी केला असेही पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 10:05 am

Web Title: rajsamand chargesheet love jihad cover for shambulal regar ties with hindu sister
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रावण’ तर राहुल गांधी ‘राम’; अमेठीत वादग्रस्त पोस्टर
2 आणखी एक निर्भया: १५ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या
3 ‘..अन्यथा २०२४ नंतर मुस्लिमांना देशाबाहेर जावे लागेल’
Just Now!
X