News Flash

धक्कादायक ! महिलेवर सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड

घटनतेली पाच पैकी चार आरोपींना अटक

राजस्थानातील पाली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका ३० वर्षीय विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार करून आपल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

पोलीसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या पाच नराधमांपैकी चौघांना सोमवारी अटक करण्यात आलेली आहे. तर एक जण अद्याप फरार आहे. महिलेने याबाबत घटनेच्या दुस-या दिवशी तक्रार दाखल केली होती. २६ मे रोजी पिडीत महिला आपल्या मैत्रणीबरोबर मंदिरात जात असताना हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. महिलेच्या तक्ररीवरून पोलीसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला असल्याचे पोलिस स्टेशन प्रभारी किशोर सिंह भाटी यांनी सांगितले आहे.

महिलेच्या तक्ररीवरून याप्रकरणी जितेंद्र भट्ट, गोविंद भट्ट, दिनेश भट्ट व महेद्र भट्ट या चौघांना सोमवारी अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना चौकशीनंतर न्यायालयात सादर केले जाईल. त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असे किशोर सिंह भाटी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:43 pm

Web Title: rajsthan five men rape woman and upload video on social media
Next Stories
1 भांडण सोडवायला गेलेल्या कमांडोची हत्या
2 केरळमध्ये ‘हाय अलर्ट’, निपाह व्हायरस बाधित रुग्ण आढळला
3 ओला उबेरच्या व्यवसाय वाढीला ब्रेक ; भाड्यातही वाढ
Just Now!
X