News Flash

उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा, व्यंकय्या नायडूंनी दिली समज, म्हणाले…

उदयनराजेंनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत पार पडला. करोनामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांच्यासहित उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान शपथ घेताना केलेल्या एका गोष्टीमुळे व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजेंना समज दिली.

उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत शपथ घेतली. शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर वैंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा’, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली.

उदयनराजे यांच्याप्रमाणे रामदास आठवले यांनीदेखील इंग्रजीत शपथ घेतली. शरद पवार यांनीदेखील इंग्रजीतून शपथ घेतली. तर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपाचे भागवत कराड आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी मराठीतू शपथ घेतली. फौजिया खान यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या शपथविधीला हजर नव्हत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 2:45 pm

Web Title: rajya sabha chairman venkaiah naidu bjp udyanraje bhosale oath ceremony sgy 87
Next Stories
1 राजस्थानातील नाट्य सर्वोच्च न्यायालयात; उच्च न्यायालयाच्या आदेशाला अध्यक्षांनी दिलं आव्हान
2 अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
3 आई-वडिलांची हत्या करणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांना मुलीने एके-४७ ने गोळ्या घालून केलं ठार
Just Now!
X