01 March 2021

News Flash

राज्यसभेतही काँग्रेस करणार भाजपाची कोंडी; उपसभापतीपद देणार या पक्षाकडे?

राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे.

गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवणाऱ्याचा किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितला होता. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

कर्नाटक आणि पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांना एकत्र आणून भाजपाला धक्का दिल्यानंतर आता काँग्रेसने राज्यसभेतही भाजपाची कोंडी  करण्याची तयारी सुरु केली आहे. उपसभापतीपदासाठी काँग्रेसने बिजू जनता दलाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांनी यासंदर्भात बिजू जनता दलाचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. कर्नाटकच्या धर्तीवर आघाडीतील पक्षांना महत्त्वाच्या पदावर संधी देऊन आघाडी भक्कम करण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत.

बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांनी वेळोवेळी भाजपाशी जुळवून घेतले असून केंद्र सरकारच्या निर्णयांचे त्यांनी समर्थन केले आहे. वेळप्रसंगी त्यांच्या पक्षाने राज्यसभेत विरोधकांना पाठिंबा देणे टाळले. राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे. बहुमतासाठी १२२ खासदारांचे संख्याबळ गरजेचे असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) १०५ खासदारांचे संख्याबळ आहे. याशिवाय ६ अपक्ष खासदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या मतांना महत्त्व प्राप्त होते.

बिजू जनता दलाचे राज्यसभेत ९ खासदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बिजू जनता दलाचे मत आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले सुरु आहेत. विरोधकांची आघाडी भक्कम करुन भाजपाला शह देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. बिजू जनता दल काँग्रेसप्रणित आघाडीत सामील झाल्यास काँग्रेसला १२२ चे संख्याबळ गाठता येईल आणि हे पदही भाजपाकडे जाणार नाही, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटते.

बिजू जनता दलासाठी काँग्रेसने उपसभापतीपदही सोडण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा असूनही मुख्यमंत्रीपद जनता दल सेक्युलर या पक्षाकडे दिले. याच धर्तीवर उपसभापतीपदही आघाडीतील एखाद्या पक्षाला देऊन आघाडी भक्कम करण्याची काँग्रेसची खेळी आहे. बिजू जनता दलाशिवाय तृणमूल काँग्रेसकडेही हे पद दिले जाऊ शकते का, याबाबत चाचपणी सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 1:25 pm

Web Title: rajya sabha deputy chairman election congress may support bjd to defeat nda
Next Stories
1 सीतेला रावणानं नाही रामानं पळवलं, गुजरातच्या पाठ्यपुस्तकात घोडचूक
2 बोधगया स्फोटातील पाच दोषींना जन्मठेप
3 चंदा कोचर यांना सुट्टीवर पाठवलेलं नाही, ICICI बँकेकडून स्पष्टीकरण
Just Now!
X