News Flash

आता संसद टीव्ही! लोकसभा-राज्यसभा टीव्ही चॅनेलचं सरकारकडून विलीनीकरण

रवि कपूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती

संग्रहित छायाचित्र

संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दाखवणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचं सरकारनं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही वाहिन्यांची एकच वाहिनी केली जाणार असून, त्याचं नाव संसद टीव्ही असं असणार आहे. याच चॅनेलवरून आता दोन्हा सभागृहांच्या कामजाचा प्रक्षेपण केलं जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींच्या निर्णयानंतर दोन्ही वाहिन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचं प्रक्षेपण लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही वाहिन्यांवरून केलं जातं. त्याचबरोबर इतर चर्चा आणि वार्ताकंनही या वाहिन्यांवरून केलं जातं. आता दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या संमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे. सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी यापूर्वी विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.

लोकसभेचं कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही सुरू करण्यात आली होती. १९८९मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचं कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आली. २०११मध्ये ही स्वतंत्र वाहिनी सुरू झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 11:55 am

Web Title: rajya sabha tv and lok sabha tv merged into sansad tv bmh 90
Next Stories
1 VIDEO: भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने सोसायटीने कुटुंबाला ठेवलं ओलीस; पोलिसांना करावी लागली मध्यस्थी
2 इंडिगोच्या विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग, तरीही नाही वाचला प्रवाशाचा जीव
3 “तरुणांसमोर मोठं आयुष्य आहे, त्यांना आधी लस द्या”; मल्लिकार्जून खर्गेंची मागणी
Just Now!
X