News Flash

…म्हणून राज्यवर्धनसिंह राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान नाही

जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून राज्यवर्धनसिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती.

संग्रहित छायाचित्र

राजस्थानमधील जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जाणारे राज्यवर्धनसिंह राठोड यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये क्रीडा आणि माहिती व प्रसारण या मंत्रालयाची धूरा सांभाळणारे राज्यवर्धनसिंह राठोड यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून राज्यवर्धनसिंह राठोड यांना राजस्थानमध्ये पक्षाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून राज्यवर्धनसिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. राज्यवर्धनसिंह यांच्याविरोधात काँग्रेसने कृष्णा पुनिया यांना रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे राज्यवर्धनसिंह राठोड- कृष्णा पूनिया यांचा २००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक चमूत समावेश होता. २०१४ मध्ये राज्यवर्धनसिंह राठोड तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते.  यंदाच्या निवडणुकीत राज्यवर्धनसिंह यांना तब्बल ८ लाख २० हजार १३२ मते मिळाली होती. तर कृष्णा पुनिया यांना ४ लाख २६ हजार ९६१ मते मिळाली होती.

गुरुवारी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून यात राज्यवर्धनसिंह राठोड यांना स्थान मिळालेले नव्हते. राज्यवर्धन राठोड यांना उमेदवारी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या राज्यवर्धनसिंह राठोड यांना राजस्थानमधील महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मंत्रीपद हुकले तरी राज्यवर्धनसिंह राठोड यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी पहिल्या टर्ममध्ये मंत्रीपदावर संधी दिल्याबद्दल मोदींचे आभारही मानले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयात काम करत असताना मला देशातील विचारवंत आणि अथक परिश्रम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 5:36 pm

Web Title: rajyavardhan rathore not get seat in modi cabinet may get key role in rajasthan bjp
Next Stories
1 लोकसभा पराभव : राष्ट्रवादीची चिंतन बैठक; शरद पवार घेणार आढावा…
2 ट्रम्प बरोबर चर्चा फेल झाल्याने किमची सटकली, पाच अधिकाऱ्यांना देहदंड
3 स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय निर्मितीद्वारे पंतप्रधान मोदींची वचनपूर्ती
Just Now!
X