केंद्रीय क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्व पटवून देण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली आहे. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी क्रिडा मंत्रालय हाती घेतलेल्या राज्यवर्धन सिंह राठोड यांनी एक व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत ते त्यांच्या कार्यालयात बसल्याचं दिसत आहे. यावेळी बोलताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जेमुळे प्रभावित होत असल्याचं ते सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस-रात्र काम करत असतात आणि त्यांची इच्छा आहे की, संपुर्ण भारताने फिट राहावं. आपल्या कामात व्यायामाचा समावेश करण्याचं आवाहन करत हा फिटनेस मंत्र शेअर करण्यासही ते सांगत आहेत.

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लोकांना व्यायाम करत असतानाचा आपला व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. या व्हिडीओत आपल्या कार्यालयात ते पुश अप्स मारताना दिसत आहेत. ट्विट करताना त्यांनी या चॅलेंजसाठी ह्रतिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवालला टॅग केलं आहे.

सोशल मीडियावर राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या या मोहिमेचं कौतुक होत आहे. राज्यवर्धन सिंह राठोड स्वत: एक खेळाडू राहिले आहेत. त्यांनी देशासाठी ऑलिम्पिक मेडलही जिंकलं आहे. त्यामुळे त्यांच्या या मोहिमेचा वेगळा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajyavardhan singh rathore starts hum fit to india fit challenge
First published on: 22-05-2018 at 13:54 IST