केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता जवळपास ८० दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर, केंद्र सरकारकडून वेळोवेळी चर्चेची तयारी दर्शवली जात आहे. याशिवाय शेतकरी आंदोलनाच्या मुद्य्यावरून आता देशातील राजकीय वातावरण देखील चांगलच तापलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला जाहीरपणे इशाराच दिला.

Video : आंदोलनातील शेतकरी घरी असते, तरी मेले असते; भाजपा मंत्र्यांचं धक्कादायक विधान

“सरकारने जास्त डोकं खराब करू नये, सध्या तरी देशाच्या जवान व शेतकऱ्यांनी कायदा परत घेण्याचाच नारा दिलेला आहे, जून सत्ता परत करण्याचा नारा दिलेला नाही.” असं राकैश टिकैत म्हणाले आहेत.

तसेच, “लाल किल्ल्यावरील हिंसाचारावरून सरकारने द्वेष पसरवण्याचं काम केलं, असल्याचाही टिकैत यांनी आरोप केला आहे. शेतकरी तोपर्यंत गप्प बसणार नाहीत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण केली जात नाही. कृषी कायदा रद्द होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.” असं कर्नाल महापंचायतीत बोलताना टिकैत म्हणाले आहेत.