22 September 2020

News Flash

राम मंदिर भूमिपूजन: २२ किलो वजनाची चांदीची वीट ठेवून रचला जाणार पाया

विटेवर लिहिण्यात आला राम मंदिर भूमिपूजन मुहूर्त

अयोध्येतील प्रभू राम मंदिराचं भूमिपूजन आज दुपारी १२.३० च्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. यावेळी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या विटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. देशात करोनाचं संकट आहे. त्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही गेलंआहे. तसंच पवित्र मातीही आणली गेली आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे.

आज प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींना रत्नजडीत पोशाख घातला जाणार आहे. रामदल सेवा ट्रस्टचे पंडित कल्कीराम हे पोशाख या मूर्तींना परिधान करतील. बुधवार या दिवसाचा रंग हिरवा असतो त्यामुळे प्रभू रामचंद्र हे हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसतील असं पोशाख शिवणाऱ्या भगवत प्रसाद यांनी सांगितलं.

दरम्यान संपूर्ण अयोध्या नगरीला दिवाळीचं स्वरुप आलं आहे. भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला घरांघरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही फटाके उडवून आनंद व्यक्त केला. अनेक नागरिकांनी दीपोत्सव साजरा करण्यासोबतच फटाकेही उडवले आणि राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या आदल्या दिवशी उत्सव साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 8:12 am

Web Title: ram mandir bhumi pujan the foundation will be laid with a silver brick weighing 22 6 kg scj 81 2
Next Stories
1 …म्हणून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यामध्ये १५० करोनामुक्त पोलीस
2 अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?
3 लेबनान स्फोट : ७० जण ठार तर ४००० जखमी
Just Now!
X