राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रम ‘भविष्यातील भारत’च्या अखेरच्या आणि तिसऱ्या दिवशी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना लवकरात लवकर अयोध्येत राम मंदिर उभारलं पाहिजे असं म्हटलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चेला त्यांनी समर्थन दिलं आहे. तसंच अंतिम निर्णय राम मंदिर समितीच घेईल असंदेखील म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक भारतीयाची हिंदू हीच ओळख – मोहन भागवत

नागपुरातून चालत नाही सरकार, कधीच फोन करत नाही – मोहन भागवत

यावेळी मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणालेत की, ‘काश्मीरमधील ३७० कलमावर आमची काय भूमिका आहे हे सर्वांनाच माहित आहे. कलम हटवलं जाण्याच्या बाजूने आम्ही आहोत’. यावेळी त्यांनी आरक्षण, जाती व्यवस्था, अल्पसंख्यांक, समलैंगिकता, जम्मू काश्मीर आणि शिक्षण धोरणावर आपलं मत मांडलं. यावेळी उपस्थित लोकांकडून एकूण २१५ प्रश्न आले होते.

मुस्लीमांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकशाहीप्रधान संघटना : सरसंघचालक

जाती व्यवस्थेवरील एका प्रश्नावर बोलताना मोहन भागवत यांनी सांगितलं की, ‘आधी जाती व्यवस्था राहिली असेल, पण आता जाती अव्यवस्था आहे. सामाजिक असमानतेला वाढ देणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत. हा प्रवास मोठा आहे, पण करणं गरजेचं आहे. संघात कधीही कोणाला त्याची जात विचारली जात नाही. संघात कोटा सिस्टम नाही आहे’.

गोरक्षा आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘फक्त गाय नाही तर कोणत्याही मुद्द्यावर कायदा हातात घेणं किंवा तोडफोड करणं चुकीचं आहे. गोरक्षा झाली पाहिजे, मात्र गोरक्षक आणि गोंधळ माजवणाऱ्यांमध्ये तुलना होता कामा नये’.

भारतात राहणाऱ्या प्रत्येकाची हिंदू हीच ओळख आहे असंही मोहन भागवत बोलले आहेत. ‘भारतात राहणारे सगळेजण हिंदू आहेत. हे सांगायल ते घाबरतात. सर्व लोक आपलेच आहेत. आपली संस्कृती हीच आपली एकता आहे’, असं मोहन भागवत बोलले आहेत. तसंच आरएसएस कधीच आंतरजातीय विवाहाविरोधात नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir should be built earliest says mohan bhagwat
First published on: 19-09-2018 at 21:02 IST