राम जन्मभूमी प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही देशभरातून राम मंदिराच्या उभारणीवरुन राजकीय वक्तव्ये होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राम मंदिर सर्वांच्या राजीखुशीने होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या मते एका चांगल्या वातावरणात राम मंदिराची उभारणी व्हावी. दरम्यान, अध्यादेशाच्या माध्यमातून रामजन्मभूमी येथे मंदिर उभा करण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, हिंदू संघटनांनी मंगळवारी राम मंदिर निर्मितीसाठी १ ते ६ डिसेंबरपर्यंत महायज्ञ करणार असल्याचे जाहीर केले आहे. देशभरातील संत मोठ्यासंख्येने यज्ञ करण्यासाठी अयोध्येत येतील, असे दिल्लीतील विश्व वेदांत संस्थेने म्हटले आहे. तर दुसरीकडे मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी मोठे वक्तव्य केले. राम मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने लोकसभेत विधेयक आणले पाहिजे. ते विधेयकाच्या माध्यमातून हे प्रकरण संपवले पाहिजे. सरकारने जर कायदा बनवला तर आमची हरकत नसेल. आम्ही एकट्याने कायदा रोखू शकत नाही.

दरम्यान ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभरात दंगल उसळली होती.