भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन न केल्यावरून बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या या कृतीमुळे एनडीएचा दलितविरोधी चेहरा उघड झाल्याची टीका मायावती यांनी केली. रामनाथ कोविंद यांनी ज्याप्रमाणे राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच त्यांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करायला पाहिजे होते. मात्र, तसे घडले नाही. हा ‘एनडीए’च्या आंबेडकर विरोधाचा पुरावा असल्याचे मायावतींनी म्हटले.

याशिवाय, मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांना गुजरात दौऱ्यावरून लक्ष्य केले. देशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. अशावेळी पंतप्रधान केवळ गुजरातचाच दौरा करतात. ते आता गुजरातचे मुख्यमंत्री राहिले नसून देशाचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व राज्यांना समान मदत केली पाहिजे, असे मायावती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दलितांवर होत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित न करू दिल्यामुळे गेल्याच आठवड्यात ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

रामनाथ कोविंद आज घेणार राष्ट्रपतिपदाची शपथ; मुखर्जींचा नव्या घरात गृहप्रवेश

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती बनले आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस.केहर यांनी त्यांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर लगेचच ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’चे नारे देण्यात आले. संसद भवनात ‘जय श्री राम’चे नारा देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही भाजप सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर आयोजित स्वागत समारंभावेळीही असा नारा देण्यात आला होता. त्यावेळी ‘जय श्री राम’बरोबर ‘मोदी-मोदी’ अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या.

कोविंद यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय