दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी आम आदमी पार्टीचे (आप) आमदार रामनिवास गोयल यांची सोमवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. दिल्ली विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.
गोयल यांच्याप्रमाणेच सत्तारूढ पक्षाच्या आमदार वंदनाकुमारी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ तीनच जागा मिळाल्या असून तोच विरोधी पक्ष आहे.
गोयल शाहदरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. गोयल आणि त्यांच्या समर्थकांनी या परिसरातील अनेक घरावर छापे टाकल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर गोयल यांच्याविरोधात ७ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदविण्यात आला.
वंदनाकुमारी या ‘आप’च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत.