News Flash

‘डेरा सच्चा सौदा’च्या अनुयायांनी शांतता बाळगावी,पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे आवाहन

हरयाणातील सिरसा भागात संचारबंदी लागू

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप ठेवून त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हरयाणातील पंचकुलामध्ये हिंसाचार माजला आहे. दिल्ली, पंजाब, हरयाणा या ठिकाणी डेरा सच्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली आहे. या सगळ्या अनुयायांनी शांतता बाळगावी असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डेरा सच्चाच्या अनुयायांना शांततेचे आवाहन केले आहे.

पोलीस आणि सैन्यदलांकडून कारवाई सुरू आहे. मात्र आंदोलकांचा राग काही शांत होताना दिसत नाहीये. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांची सुनावणी हरयाणातील पंचकुलामध्ये होती. या सुनावणीत बाबा राम रहिम यांना दोषी मानण्यात आले असून शिक्षेची सुनावणी सोमवारी म्हणजेच २८ ऑगस्टला होणार आहे. सीबीआय कोर्टाने हा निर्णय देताच हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना सुरू झाल्या आहेत. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी डेरा सच्चाच्या अनुयायांनी शांत राहावं असे आवाहन केले आहे.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे तोडफोड झालेल्या भागांची पाहाणी करत आहेत. अनेक अनुयायांना ताब्यात घेण्यात आले आहे मात्र आंदोलक अनुयायांची संख्या मोठी आहे आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया खट्टर यांनी दिली आहे.

हरयाणातील सिरसा या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सैन्यदलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. असं असूनही आंदोलक अनुयायी आणि सुरक्षा रक्षक, पोलीस यांच्यात हाणामारीच्या आणि वादावादीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर हरयाणातील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भेट घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 9:37 pm

Web Title: ram rahim verdict president ramnath kovind condemns violence appeals citizens to maintain peace
Next Stories
1 ‘मोबाईल वॉलेट’वरील व्यवहार तेजीत; वार्षिक उलाढाल पोहोचणार ३२ अब्ज रुपयांवर
2 राम रहिमसहित या ‘बाबां’वर लैंगिक शोषणाचे आरोप
3 पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात बीएसएफ जवान गंभीर जखमी
Just Now!
X