19 September 2020

News Flash

CBSE 10th Result 2019 : ‘निकालाची तारीख लवकर जाहीर करू, अफवांवर विश्वास ठेवू नका’

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता

सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची तारीख लवकर अधिकृतपणे जाहीर होणार आहे. सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी रविवारी केले आहे.

सीबीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल आज (रविवार)जाहीर होणार आहे अशी अफवा असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. साधारणतः सीबीएसीई बोर्डाचा 12वीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत 10वीचा निकाल ही जाहीर करण्यात येत असतो. पण यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची सूचना सीबीएसीई बोर्डाकडून देण्यात आलेली नाही आहे.

सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी सांगितले की, “सोशल मिडीयावर निकालासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल आज जाहीर होणार नाही आहे.” बोर्डाकडून निकालासंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यात येईल असे त्या म्हणाल्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. असे सीबीएसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अद्यापही निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.

असा पाहा निकाल –
cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जा

संकेतस्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

बैठक क्रमांक टाका

निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 3:36 pm

Web Title: rama sharma pro cbse board will duly inform the date time and arrangements to access results through official communication
Next Stories
1 राहुल तुमच्या वडिलांची कारकिर्द ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’ म्हणून संपली – मोदी
2 लढाई संपली, कर्माची फळं भोगायला तयार राहा; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर
3 साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा अडचणीत, निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस
Just Now!
X