सध्या संसदेत लोकसभेचं कामकाज सुरु असून नव्या अध्यक्षांची निवडही झाली आहे. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे खासदार रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन केले. आपल्या कवितेतून आठवलेंनी बिर्ला यांचे स्वागत केले. ‘एका देशाचं नाव आहे रोम ,लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल असं म्हणताच मोदींनाही हसू लपवता आले नाही. आठवलेल्यांच्या काव्यत्मक शुभेच्छा ऐकल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही हसू आवरता आले नाही.

आठवलेंनी बिर्ला यांना शुभेच्छा देताना सल्लाही दिला आहे. ओम बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी तत्काळ आपला पदभार स्वीकारला.

आठवले यांची कविता –
‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिड़ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन’

काँग्रसवरही साधला निशाना –

निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. परंतु हवा कोणत्या दिशेने जात हे मी अचूक ओळखलं आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. जनतेने सरकारला दिलेला कौल पाहता विरोधकानीही सभागृहाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षाला मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. तसेच आपलं सरकार सर्व राज्यांना समान न्याय देईल. पुढील पाच काय तर वर्षानुवर्ष आमचंच सरकार येत राहिल. आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही, अशी मिश्कील टीकाही त्यांनी यावेळी केली. यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता