04 March 2021

News Flash

‘Covid-19 वर कोरोनिल प्रभावी’, रामदेव बाबांचा पुन्हा दावा! रिसर्च पेपर केला प्रकाशित!

पुन्हा एकदा रामदेव बाबांनी पतंजलीच्या कोरोनिल टॅब्लेट्स करोनावर प्रभावी ठरल्याचा दावा केला आहे.

Covid-19 च्या लशीसाठी जगभरातले नागरिक प्रतीक्षा करत असताना योगगुरू रामदेव बाबा यांनी स्वदेशी बनावटीची Coronil Tablet ही करोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. तसेच, केंद्रीय आयुष मंत्रालयाने देखील त्यांना सुनावले होते. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी तसाच दावा केला असून आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी एक रिसर्च पेपरच प्रकाशित केला आहे. या प्रकाशनासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे कोरोनिलच्या उपयुक्ततेवरून पुन्हा एकदा देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू होणार आहे.

आयुष मंत्रालयाने दिला होता नकार!

गेल्या वर्षी कोरोनिल टॅब्लेट लाँच झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. जगभरातले शास्त्रज्ञ करोनावरच्या लशीसाठी संशोधन करत असताना रामदेव बाबांच्या पतंजलीने करोनावर प्रभावी ठरणाऱ्या गोळ्या तयार केल्याचा दावा केला होता. तसेच, या टॅब्लेट्सला त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची, तसेच आयसीएमआरची परवानगी देखील घेतली नव्हती. अखेर, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅब्लेटच्या तपासणीनंतर त्या प्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या गोळ्या म्हणूनच विकण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटची करोना व्हॅक्सिन देशभरात वितरीत झाल्यानंतर पुन्हा एकदा रामदेव बाबांनी करोनावर उपाय म्हणून कोरोनिलचं समर्थन केलं आहे. यासाठी त्यांनी प्रकाशित केलेल्या रिसर्च पेपरमध्ये कोरोनिलला ‘कोविड-१९ वरचं पहिलं पुराव्यांवर आधारित औषध’ असं देखील म्हटलं आहे. त्यासोबतच औषधांसाठी असलेलं CoPP-WHO GMP प्रमाणपत्र देखील मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

CoPP-WHO GMP प्रमाणपत्र म्हणजे काय?

CoPP म्हणजेच Certificate of a Pharmaceutical Product हे कोणत्याही औषधाचा दर्जा ठरवण्यासाठी दिले जाते. WHO अर्थात World Health Organisation कडून ते दिले जाते.

 

मात्र, कोरोनिलबाबत अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा आयसीएमआरकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्यामुळे करोनावर उपचार म्हणून फक्त मान्यताप्राप्त लशी, अर्थात सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचाच वापर होऊ शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:29 pm

Web Title: ramdev baba research paper claims coronil first evidence based medicine pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 नासाच्या पर्सिव्हिअरन्स मार्स मिशनमध्ये स्वाती मोहन यांनी पार पाडली महत्त्वाची जबाबदारी
2 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग ११ व्या दिवशी वाढ; जाणून घ्या मुंबईसह इतर राज्यांमधील दर
3 चीनने पहिल्यांदाच केलं मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू
Just Now!
X