News Flash

रामदेव बाबा विरुद्ध अ‍ॅलोपॅथी डॉक्टर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात

रामदेव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितला आहे.

संग्रहीत छायाचित्र (सौजन्य : ट्वीटर)

अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या विवादास्पद विधानानंतर योगगुरू रामदेव बाबा नेहमीच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर देखील त्यांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे. या त्रासापासुन मुक्त होण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. रामदेव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितला आहे. रामदेव बाबा यांच्या विधानानंतर इंडियन मेडिकल असोसिएशने त्यांच्या विरोधात देशात अनेक राज्यात एफआर दाखल केले आहेत.

रामदेव यांनी त्यांच्याविरोधात देशातील इतर राज्यात नोंदवलेला खटला दिल्लीत वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरूद्ध पाटणा आणि रायपूर येथे गुन्हे दाखल आहेत. यासह रामदेव यांनी या प्रकरणांमध्ये सध्या होणाऱ्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात स्थगितीची मागणी केली आहे.

हेही वाचा- रामदेवबाबा अशिक्षित व्यक्ती – डॉ. आढाव

यापुर्वी गेल्या आठवड्यात, योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातला अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रामदेव बाबांवर जीवघेणे आजार पसरवण्याची कृती करणे, शांतता भंग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA (Indian Medical Association) च्या छत्तीसगड विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातली तक्रार आयएमएनं केल्यानंतर त्यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.

तक्रारीमध्ये व्हायरल व्हिडीओंचाही उल्लेख

यासंदर्भात आयएमएच्या हॉस्पिटल बोर्डचे संचालक आणि रायपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. राकेश गुप्ता आणि विकास अगरवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षभरापासून योगगुरू रामदेवबाबा चुकीची माहिती पसरवत आहेत. त्याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल झालेली त्यांची धमकीवजा विधानं, वैद्यकीय क्षेत्र, आयसीएमआर आणि इतर फ्रंटलाईन संघटनांबाबतची मांडलेली भूमिका यावर तक्रारीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. उपचारांविषयी गैरसमज पसरवणारे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

ज्या काळात डॉक्टर, पॅरामेडिक कर्मचारी, सरकार आणि प्रशासन एकत्रपणे करोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यावेली रामदेवबाबा सर्वमान्य उपचार पद्धतींवर आक्षेप घेऊन त्याविषयी गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:12 pm

Web Title: ramdev baba rushes to supreme court to seek fir relief across the country srk 94
टॅग : National News
Next Stories
1 क्रूरपणाचा कळस! Insuranceच्या पैश्यांसाठी नऊ वर्षांच्या चिमुकलीचा बळी
2 “काँग्रेस आघाडीसाठी कुमकुवत, विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवणार”
3 “….तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही”, लसीकरणावरुन राहुल गांधींनी पुन्हा साधला निशाणा
Just Now!
X