योगगुरु रामदेव बाबांची लंडनमधल्या हिथ्रो विमानतळावर सहा तास चौकशी करण्यात आली. सुरुवातीला रामदेव यांची चौकशी इमिग्रेशन विभागाने केली. त्यानंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली.
पतंजली योगपीठाद्वारे आयोजित स्वामी विवेकानंद यांच्या १२०व्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी बाबा रामदेव लंडनमध्ये गेले होते. रामदेव बाबांकडे काही हिंदी आणि संस्कृत पुस्तकं तसंच आयुर्वेदीक औषधंही होती. तसेच, ते लंडनमध्ये बिजनेस व्हिसा ऐवजी व्हिझीटर व्हिसावर आले होते. याच कारणावरुन त्यांची चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सहा तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रामदेव बाबांना सोडण्यात आले आहे.
शिकागोमध्ये २७ आणि २८ सप्टेंबर रोजी विश्व धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रामदेव बाबा अमेरिकेलाजाणार आहे.