लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या वावड्यांना रामदेव बाबांनी पूर्ण विराम दिला आहे.
योगगुरू रामदेव बाबा म्हणाले, “मी यापूर्वीही कधी कोणत्या राजकीय पक्षाची संबंधित राहीलेलो नाही आणि यापुढेही कोणत्या पक्षात प्रवेश करुन राजकारण करण्याचा माझा मनसुबा नाही. आतापर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या संपर्कात नाही हे मला माहिती आहे आणि यापुढेही मी कधी कोणत्याही पक्षात सामिल होणार नाही.”
देशातील सध्याच्या दोन महत्वाच्या मोदी आणि राहुल गांधी या चर्चीत राजकीय पुढाऱयांवर बोलताना रामदेव बाबा म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची एकमेकांशी तुलना करणे शक्य नाही. या दोघांमधील एक जण घराणे राजकारणात असल्याने तर, एकजण राजकारणात केलेल्या मेहनतीमुळे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यानुसार हे दोनही नेते लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. असेही रामदेव म्हणाले.