येथील ख्रिश्चन शाळेतील जोगिणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेला सहा दिवस उलटूनही कुठलेच धागेदोरे हाती आलेले नाहीत. दरम्यान, या जोगिणीला (नन) उपचारांनंतर अज्ञात ठिकाणी जाऊ देण्यात आले. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
राणाघाटचे उपविभागीय रूग्णालय अधीक्षक ए.एन. मोंडाल यांनी सांगितले की, या जोगिणीला नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडण्यात आले, तेथून ती अज्ञात स्थळी निघून गेली.
पहाटे २.२० वाजता तिला रूग्णालयातून सोडण्यात आले व त्यानंतर २५ मिनिटे ख्रिश्चन शाळेच्या अधिकाऱ्यांना त्या भेटल्या व नंतर आपल्या चीजवस्तू घेऊन निघून गेल्या. रूग्णालयाचे डॉक्टर तपस मुळीक हे वयस्कर जोगिणीच्या बरोबर होते, तसेच शाळेचे अधिकारी होते.