News Flash

न्या. रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता

न्या. रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश
न्या. रंजन गोगोई

भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘एएनआय’ने सूत्रांमार्फत या संबंधी माहिती दिली असून ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून गोगोई शपथ घेण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना कायदा मंत्रालयाने एक पत्र पाठवले होते. त्यात मिश्रा यांनी नव्या सरन्यायाधीशांसाठी शिफारस करावी, अशी विनंती करण्यात आली होती. या पदावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यात न्या. गोगोई यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांच्याच नावाची सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

न्या. गोगोई हे २८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. एप्रिल २०१२पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, २०१७ साली सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायधीशांनी केलेल्या बंडात न्या. गोगोई यांचा समावेश होता. त्यावेळी पाच न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 10:39 pm

Web Title: ranjan gogoi to be next cji after deepak mishras recommendation
Next Stories
1 जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान, दोन जवान जखमी
2 महात्मा गांधींची हत्या करणारे लोक सत्तेत -स्वरा भास्कर
3 चोरी करणारे ‘लव्ह पार्टनर्स’ गजाआड
Just Now!
X