22 March 2019

News Flash

धक्कायदाक ! अडीच लाखांचा दंड ठोठावत करण्यात आली बलात्कार आरोपीची सुटका

आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरिरसंबंध ठेवत गर्भवती केलं होतं

तेलंगणामध्ये एका गावातील ज्येष्ठ नागरिकांनी बलात्कार आरोपीची अडीच लाखांचा दंड ठोठावत सुटका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरिरसंबंध ठेवत गर्भवती केलं होतं. महबूबनगर जिल्ह्यामधील नारायणपेठ गावातील ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑगस्ट रोजी हा निर्णय सुनावला होता. पोलिसांनी निर्णय सुनावणाऱ्या सहा जणांपैकी चौघांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक एम कृष्णैय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात हजर केलं असता सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडित तरुणी अल्पवयीन असल्या कारणाने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी १७ वर्षीय असून आपल्या आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असे. आरोपी वैंकटय्या शेतीमालक आहे. त्याने लग्नाचं खोटं आश्वासन देत तिच्यासोबत शरिरसंबंध ठेवले.

तरुणीच्या आईला मुलीमध्ये बद्दल जाणवू लागल्यानंतर त्यांनी वैद्यकीय चाचणी करुन घेतली. काही ग्रामस्थांनी पीडित आणि आरोपींमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पीडित तरुणीच्या आई-वडिलांना तोंड बंद ठेवण्यासाठी अडीच लाख रुपये देऊ केले. पोलिसांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली.

First Published on August 11, 2018 8:12 am

Web Title: rape accused release penalty two and half lakhs