23 February 2019

News Flash

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

महिलेने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. तक्रारीनुसार हा प्रकार सात ते आठ महिन्यांपूर्वी घडला आहे.

एका २४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका २४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर २ ऑगस्ट रोजी गोहेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नगांवचे पोलीस उपअधीक्षक सबिता दास यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणी तपास करत असून कायद्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असेही त्या म्हणाल्या पण अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

मागील आठवड्यातच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नगांव ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी तपास केला जात असून पीडित महिलेचा जबाब घेतला आहे. महिलेने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. तक्रारीनुसार हा प्रकार सात ते आठ महिन्यांपूर्वी घडला आहे. गोहेन आणि पीडित महिला दीर्घ काळापासून एकमेकांना ओळखतात. गोहेन हे त्या महिलेच्या घरी वारंवार जात.

महिलेचा पती आणि तिचे कुटुंबीय घरात नसताना गोहेन यांनी बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तपास केला जात असून गरज पडल्यास तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on August 10, 2018 11:00 pm

Web Title: rape case registered against union railway minister of state rajen gohain