ईटी नाऊचा अँकर वरुण हिरेमठवर बलात्काराचा आरोप करणार्‍या २२ वर्षीय महिलेने मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांना एक पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्याबद्दल महिलेने त्यांचे लक्ष वेधले आहे.
हिरेमठवर या महिलेने बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि आपल्याला कैद करून ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात हा खटला दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हिरेमठ फरार आहे.

११ मार्च २०२१ रोजीच्या एका पत्रात महिलेने १० मार्च २०२१ रोजी पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन सुनावणीचा संदर्भ दिला आहे. सुनावणीदरम्यान, तिने सांगितले की आरोपीच्या वकिलाने वारंवार तिच्याशी अभद्र व्यवहार केला तसेच बऱ्याच गोष्टींवर विनोद केले – आणि या अनादर व संवेदनशील वागण्यावर आक्षेप घेण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल हसत होते.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

“सुनावणीच्या वेळी, आरोपीचे प्रतिनिधीत्व करणारे वकील श्री. अग्रवाल यांनी वारंवार माझ्याविरूद्ध खोटी, अपमानास्पद अशी गंभीर टीका केली आणि मला हीन वागणूक दिली. श्री. अग्रवाल यांना फटकारण्याऐवजी आणि त्यांना असे करण्यापासून रोखण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल मझ्यावर अनेकवेळा हसले. ”

आरोपीच्या वकीलांची वागणूक “भयानक क्लेशकारक” होती परंतु न्यायाधीशांची वागणुकसुद्धा तशीच आहे यावरून ती अधिक जास्त धक्का बसला. मुख्य न्यायाधीश बोबडे यांना लिहितात, ” श्री. अग्रवाल यांच्या वक्तव्यांनी माझ्या चारित्र्याचे हनन झाले आहे. तर न्यायाधीशांनी त्यांच्या घाणेरड्या युक्तिवादांवरून हसून माझे दु: ख आणखीनच वाढवले आहे.”

“बलात्काराच्या घटनेनंतर माझा मानसिक त्रास झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्येसुध्दा मी पोलिसांकडे गेले व तक्रार दाखल केली, का तर आरोपीला जबाबदार धरले जावे. त्यासाठी मी या तक्रारीचा पाठपुरावा देखील केला होता. तथापि, या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्यामुळे, माझे दु: ख आणि मानसिक आघात आणखी तीव्र झाले आहेत. काल झालेल्या घटनांमुळे फौजदारी न्याय प्रणालीच्या कामकाजावरील माझा विश्वास पूर्णपणे डळमळला आहे. सर, मला न्याय मिळाल्याच्या निरर्थक आशेने माझ्या तक्रारीचा पाठपुरावा केल्याबद्दल मला वाईट वाटते. ”

महिलेने पुढे सांगतले की, “इतर कोणत्याही पीडिताला तसा अपमान सहन करावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी म्हणून आपण योग्य ती पावले उचलावीत या आशेने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे.”