गोव्यात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. वास्को शहरातील विमानतळाजवळ तरुणीवर चालकाने बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी चालक रवीचंद्र भट याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित तरुणी एअरपोर्टजवळ एकटीच फिरत असताना टॅक्सी चालकाने तिला लिफ्ट देऊ केली. जेव्हा तरुणीने नकार दिला तेव्हा चालकाने तिला जबरदस्तीने ओढत टॅक्सीत बसवलं आणि वास्को येथील एका निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केला’.
पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी चालक विमानतळ मार्गावर टॅक्सी चालवत असून, वास्कोमध्येच वास्तव्यास आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 4:01 pm