News Flash

मध्यप्रदेशातही पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीवरील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच मध्यप्रदेशात भोपाळ येथेही पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

| April 21, 2013 11:43 am

दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीवरील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच मध्यप्रदेशात भोपाळ येथेही पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला नागपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील घानसौर गावात राहत असलेल्या या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून फिरोज खान(३५) या नराधमाने बलात्कार केला आणि त्यानंतर तिला शेतात टाकून दिले. त्यानंतर दुस-या दिवशी मुलीच्या कुटूंबीयांना ती जखमी अवस्थेत सापडल्याने तिला स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असेही पोलिसांनी सांगितले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला आता नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर, आरोपी फिरोजला पोलिसांनी अटक केली आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 11:43 am

Web Title: rape on five year old girl in madhya pradesh
टॅग : Madhya Pradesh
Next Stories
1 दिल्लीत जनक्षोभ!
2 चीनमधील भूकंपात १६१ मृत्युमुखी
3 बोस्टन : दुसऱ्या संशयितास अटक
Just Now!
X