05 March 2021

News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण पंचायतीत मिटवण्याचा प्रयत्न; २० जणांवर गुन्हा

सदर मुलीने काल रात्री मदमारी पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून त्यात पाच जणांवर आरोप करण्यात आले आहेत.

| May 7, 2016 02:20 am

तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्य़ात एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण खेडय़ातील पंचायतीच्या माध्यमातून आपसात मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सदर मुलीने काल रात्री मदमारी पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून त्यात पाच जणांवर आरोप करण्यात आले आहेत. ते तिच्या शेजारी राहणाऱ्यांपैकी असून त्यांनी २०१५ पासून तिला धमकावत सातत्याने बलात्कार केला, असे पोलिस निरीक्षक पी.सदय्या यांनी सांगितले. सदर मुलीने अदिलाबादमधील कासीपेट मंडलातील पालेमगुडाच्या गावकऱ्यांकडे दाद मागितली होती, त्यावर एका आरोपीने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. तिला अडीच लाख रूपये देण्याचे (प्रत्येक आरोपीकडून ५० हजार याप्रमाणे) आमिष दाखवण्यात आले व प्रकरण मिटवून टाक असे सांगितले गेले. त्यानंतर ती व तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली, असे पोलिस उप अधीक्षक रमणा रेड्डी यांनी सांगितले. गांवक ऱ्यांनी याप्रकरणी पंचायत बोलावली होती व त्यांनी बलात्काराचे प्रकरण पोलिसांना सांगणे अपेक्षित होते पण त्यांनी तसे न केल्याने कलम २०१ अन्वये वीस गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 2:20 am

Web Title: rape on girl in hyderabad
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये मंगळवारी शक्तिपरीक्षा
2 ‘बोफोर्स’मध्ये साधले नाही, ते ‘ऑगस्टा’त करू!
3 गुरुत्वाकर्षण लहरींच्या संशोधनाला २० कोटी रुपयांचा मिलनर पुरस्कार
Just Now!
X