News Flash

दिल्लीत अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

दोन अल्पवयीन मुलींवर दिल्लीत सामूहिक बलात्कार झाला असून, त्यामुळे राजधानी दिल्ली पुन्हा हादरली आहे.

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

दिल्ली पोलीस अपयशी- केजरीवाल
दोन अल्पवयीन मुलींवर दिल्लीत सामूहिक बलात्कार झाला असून, त्यामुळे राजधानी दिल्ली पुन्हा हादरली आहे. चार वर्षांच्या एका मुलीवर गेल्या आठवडय़ात ईशान्य दिल्लीत बलात्कार झाला होता. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या वारंवार होणाऱ्या घटनांवर पंतप्रधान व दिल्लीचे नायब राज्यपाल काय करीत आहेत असा प्रश्न केला आहे. पश्चिम दिल्लीत निहाल विहार भागात एका अडीच वर्षांच्या मुलीवर काल बलात्कार करण्यात आला, तर पूर्व दिल्लीत आनंद विहार येथे पाच वर्षांच्या मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्या तिघांना नंतर पोलिसांनी अटक केली आहे.
अडीच वर्षांच्या मुलीला मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी काल रात्री निहाल विहार येथून तिच्या घरातून पळवून नेऊन सामूहिक बलात्कार केला. ती नंतर एका उद्यानात स्थानिक लोकांना सापडली. तिला रक्तस्राव झाला होता. नंतर तिला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले. भादंवि व पॉकसो कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आनंद विहार भागात एका पाच वर्षांच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तीन जणांनी बलात्कार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रकाश, रेवती व सीताराम यांना स्थानिक लोकांनी मुलीच्या किंकाळय़ा ऐकून पकडले व पोलिसांच्या ताब्या दिले. याप्रकरणी भादंवि व पॉकसो कायद्यानुसार आनंद विहार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपायुक्त भैरोसिंह गुर्जर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सततच्या बलात्काराच्या घटना चिंताजनक असल्याचे सांगून दिल्ली पोलीस सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला, तसेच पंतप्रधान मोदी व नायब राज्यपाल नजीब जंग काय करीत आहेत असा सवाल केला. आपण पीडितांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात आहोत असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली व ही घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याचे सांगितले. दिल्लीकर कधी जागे होणार, मुलींवर असे अत्याचार किती काळ चालू राहणार असा उद्विग्न सवाल त्यांनी केला आहे.

स्वत: कृती करा अन्यथा दिल्ली पोलिसांचे नियंत्रण ‘आप’कडे द्या

दिल्लीत दोघा अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांचे नियंत्रण आपल्या सरकारच्या हाती सोपविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट मागितली आहे. नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात दिल्ली पोलीस संपूर्ण अपयशी ठरले आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: कृती करावी अथवा राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था आप सरकारकडे सोपवावी, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांचे नियंत्रण किमान एक वर्षांसाठी आमच्याकडे सोपवावे. स्थितीत सुधारणा झाली नाही, तर पुन्हा नियंत्रण केंद्राने घ्यावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी मोदी आणि जंग यांची भेट घेण्याची इच्छाही केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:10 am

Web Title: rape on minor girls at delhi
Next Stories
1 ‘दादरी’मुळे मोदींची प्रतिमा मलिन
2 आयोगाचे सदस्य आज पाटण्यात
3 शत्रुघ्न सिन्हा यांची टीका
Just Now!
X