17 December 2017

News Flash

पंजाबमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार

कीर्ती अफगाणा गावात एका विवाहितेवर चार जणांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.

पीटीआय, बटाला | Updated: January 29, 2013 5:50 AM

डिसेंबर महिन्यात दिल्लीतील एका बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना देहान्त शासनाची शिक्षा व्हावी यासाrठी एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र असे असताना देखील देशभर महिलांवर होणारे अत्याचार व बलात्काराचे प्रकार तसूभरही कमी झालेले नाहीत. येथील कीर्ती अफगाणा गावात एका विवाहितेवर चार जणांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.
मजदुरी करणारा आपला पती घरी न आल्याने त्याच्या शोधासाठी त्याची २४ वर्षीय पत्नी २६ जानेवारीला रात्री घराबाहेर पडली. त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या चार जणांनी तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करून याबाबत तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या विवाहितेच्या आईने २८ जानेवारी रोजी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिसांनी याची दखल घेताना मनदीप मसीह, तरलाब सिंह, हरप्रीत सिंह आणि जस्सी या चौघांविरुद्ध बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी या चौघांपैकी कोणालाही अटक झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

First Published on January 29, 2013 5:50 am

Web Title: rape on women in kirti afgana village
टॅग Gangrape,Rape,Women