04 June 2020

News Flash

बलात्काऱ्यांना बुटांचे फटके मारण्याची शिक्षा

बलात्काराच्या प्रकरणातील दोघा आरोपींना भरचौकात बुटांचे प्रत्येकी पाच फटके मारावे आणि त्यांच्याकडून केवळ ५० हजार रुपये दंड वसूल करावा

| June 2, 2015 02:13 am

बलात्काराच्या प्रकरणातील दोघा आरोपींना भरचौकात बुटांचे प्रत्येकी पाच फटके मारावे आणि त्यांच्याकडून केवळ ५० हजार रुपये दंड वसूल करावा, अशी धक्कादायक शिक्षा हरयाणातील पंचायतीने ठोठावली. मात्र या शिक्षेने समाधान न झाल्याने पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हे नोंदविले आहेत.

हरयाणातील झाकोपूर येथे १२ मे रोजी एक १५ वर्षांची मुलगी शेजाऱ्यांच्या घरातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता मुनफत आणि जाबीद या चुलत भावांनी तिला जबरदस्तीने एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार सदर युवतीने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण चुलत भावांच्या कुटुंबीयांकडे नेले आणि त्यानंतर पंचायत बोलाविण्यात आली. आरोपींना केवळ जुजबी शिक्षा ठोठावून पंचायतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचायतीचा निकाल अमान्य करून पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण पोलिसांकडे नेले. त्यानंतर या प्रकरणी आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 2:13 am

Web Title: rape punishment in pakistan
टॅग Pakistan
Next Stories
1 ‘आम्ही सरकारचे गुलाम नाही’
2 देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे जनक हेमंत सोनावाला यांचे निधन
3 हुतात्मा कालियाप्रश्नी केंद्राचे घुमजाव
Just Now!
X