News Flash

पंतप्रधान मोदी मला न्याय द्या!

बलात्कार पीडितेकडून रक्ताने पत्र लिहून याचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत छायाचित्र )

बलात्कार पीडितेकडून रक्ताने पत्र लिहून याचना

बलात्कारपीडितेने न्याय मिळण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

आरोपींचे उच्चपदस्थांशी लागेबांधे असल्याने पोलीस कोणतीही कारवाई करीत नसून आरोपी खटला मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत आहेत. आपल्याला न्याय द्यावा अन्यथा आपण आत्महत्या करू, असे पीडितेने २० जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २४ मार्चला दिव्या पांडे आणि अंकित वर्मा यांच्याविरुद्ध बाराबंकी येथे बलात्काराच्या आरोपाबाबत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला आणि तेव्हापासून ते तिला ब्लॅकमेल करीत असल्याचे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:29 am

Web Title: rape victim writes a letter to narendra modi by using blood
Next Stories
1 दावोस अर्थ परिषदेत पंतप्रधान म्हणाले..
2 परिस्थिती चिघळल्यास दाद मागण्याची परवानगी!
3 लग्न करण्यासाठी लष्करी जवान दोनवेळा तळ सोडून पळाला
Just Now!
X