महिलांवर पुरूष बलात्कार करत नाहीत, तर त्यांच्या सहमतीनेच बलात्काराचे प्रकार घडतात अशी मुक्ताफळे उत्तर प्रदेशातील मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते तोताराम यादव यांनी उधळली आहेत. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
मैनपुरी येथील एका कार्यक्रमात बोलत असताना यादव यांनी बलात्काराच्या घटनांना महिलांनाच जबाबदार धरले. महिलांवर त्यांच्या संमतीशिवाय बलात्कार होऊच शकत नाही असा दावा तोताराम यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, महिलांच्या समंतीनेच बलात्कार घडतात मात्र अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस, प्रशासन आणि सरकारला जनतेच्या टीकांना सामोरे जावे लागते. जर मुलगा-मुलगी यांच्या सहमतीनेच शरीर संबंध ठेऊन नंतर त्याला बलात्काराचे स्वरूप दिले जात असेल तर यात सरकारचा काय दोष आहे, असा सवालही त्यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 2:08 am