News Flash

“जननी जन्मभूमिश्च…”, म्हणत राष्ट्रपती झाले नतमस्तक; कॅमेऱ्यात कैद झाले ‘हे’ भावनिक क्षण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या जन्मगावी भेट दिली. त्यावेळी त्यांनी वाकून जन्मभूमीला नमस्कार केला.

राष्ट्रपतींनी कानपूरमधल्या परौंख या आपल्या गावी भेट दिली. (सौजन्य- ट्विटर आणि पीटीआय)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच आपल्या मूळ गावी भेट दिली. त्यांनी उत्तरप्रदेशातल्या कानपूर देहात जिल्ह्यातल्या परौंख या आपल्या गावी जाताच गावच्या भूमीला वंदन केलं. यावेळचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत भावूक पोस्टही लिहिली आहे.

राष्ट्रपती आपल्या उत्तरप्रदेशातल्या गावी गेले तेव्हा त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही होते. त्यांनी राष्ट्रपतींचं स्वागतही केलं. या वेळी गावच्या भूमीला वंदन करतानाचा फोटो राष्ट्रपती भवनाच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.


आपल्या आयुष्यातलं आपल्या गावाचं स्थान काय आहे हे सांगताना राष्ट्रपती म्हणाले, “मी जिथे कुठे जाईन तिथे माझ्यासोबत माझ्या गावच्या मातीचा सुगंध आणि गावकऱ्यांच्या आठवणी कायम असतील. माझ्यासाठी परौंख फक्त एक गाव नाही तर माझी मातृभूमी आहे. तिच्याकडून मला कायम पुढे जात राहण्याची आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते”.

ते पुढे म्हणतात, “मी कधीच विचार केला नव्हता की माझ्यासारखा गावातला एक सामान्य मुलगा संपूर्ण देशाची जबाबदारी घेईल. त्याला देशातलं सर्वोच्च स्थान मिळेल. पण आपल्या लोकशाहीने हे करुन दाखवलं”. राष्ट्रपती कोविंद आपल्या पत्नी सवितादेवी यांच्यासोबत एका विशेष रेल्वेगाडीने कानपूर येथे आले. त्यानंतर त्यांनी आपल्या गावाला भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:17 pm

Web Title: rare emotional gesture presidents tribute to land of his birth vsk 98
Next Stories
1 ….अन् क्षणात त्यानं चालत्या विमानातून उडी टाकली! जाणून घ्या नक्की काय घडलं..
2 7th Pay commission : जुलैपासून कर्मचाऱ्यांचा DA वाढणार?; ‘त्या’ पत्रावर अर्थ मंत्रालयाने केला खुलासा
3 “माझ्यापेक्षा शिक्षक जास्त कमावतात,” राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य
Just Now!
X