ऑक्सफर्ड विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा म्हणून निवडून येऊन इतिहास रचलेल्या रश्मी सामंत यांनी काही दिवसांतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रश्मी सामंत यांनी यापूर्वी समाज माध्यमांवर टाकलेल्या काही पोस्ट या वर्णद्वेषी आणि असंवेदनक्षम असल्याचा वाद निर्माण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

जर्मनीतील बर्लिन होलोकॉस्ट स्मृतिस्थळाला २०१७ मध्ये त्यांनी भेट दिली तेव्हा टाकलेली होलोकॉस्ट पोस्ट आणि मलेशियात त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या स्वत:च्या छायाचित्राखाली चिंग चँग अशा ओळी लिहिल्या होत्या त्यामुळे चीनमधील विद्यार्थी नाराज झाले होते यांचाही समाज माध्यमांवर त्यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये समावेश आहे.

प्रचार करण्यासाठी त्यांनी टाकलेल्या पोस्टखाली लिहिलेल्या ओळींमधून महिला आणि तृतीयपंथी अशी विभागणी केली त्यावरूनही सामंत यांच्यावर टीका झाली आणि ऑक्सफर्ड एलजीबीटीक्यू प्लसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.