News Flash

राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांचं करोनामुळे निधन

खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार

संग्रहित

राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. उत्तर प्रदेशातील मोठे नेते असणाऱ्या अजित सिंह यांची फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने प्रकृती ढासळली होती. यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अजित सिंह यांच्या मुलाने ट्विट करत निधनाची माहिती दिली आहे. जयंत चौधरी यांनी ट्विटरला सोबत एक पोस्टदेखील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “२० एप्रिलला अजित सिंह यांना करोनाची लागण झाली होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते करोनाशी लढले आणि ६ मे रोजी शेवटचा श्वास घेतला. आपल्या संपूर्ण आयुष्यात अजित सिंह यांनी खूप प्रेम आणि सन्मान मिळवला”.

पुढे ते म्हणतात की, “अजित सिंह यांनी सर्वांना आपलं कुटुंब मानलं आणि नेहमी लोकांची चिंता करत राहिले. सध्याच्या करोना महामारीच्या काळात आपण सर्वांनी काळजी घ्यावी. शक्य असल्यास घराबाहेर पडू नका आणि सावधगिरी बाळगा. करोनाच्या या लढाईत डॉक्टरांना मदत मिळेल आणि हीच अजित सिंह यांना खरी श्रद्धांजली असेल”.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

अजित सिंह बागपत येथून सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय केंद्रात त्यांनी नागरी उड्डाण मंत्रीपद भूषवलं होतं.
राजकारणात येण्याआधी अजित सिंह अमेरिकेत नोकरी करत होते. १५ वर्ष तिथे नोकरी गेल्यानंर आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी ते पुन्हा भारतात परतले होते. १९८६ मध्ये सर्वात प्रथम ते राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 9:24 am

Web Title: rashtriya lok dal chief and former union minister ajit singh dies of covid 19 sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “मोदी काय म्हणतायत बघू आणि ठरवू”; करोनासंदर्भातील प्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उत्तर
2 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल
3 करोना केंद्रात मुस्लीम कर्मचाऱ्यांची नियुक्तीवरुन भाजपा नेत्यांनी घातला गोंधळ; तेजस्वी सूर्यांविरोधात व्यक्त होतोय संताप
Just Now!
X