“मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे”, असं वक्तव्य अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांना जीवानीशी मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. परिणामी त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारने त्यांना Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेसाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – “जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप

“आदरणीय श्रद्धेय योगी आदित्यनाथ महाराज जी, माझ्या सुरक्षेखातर तुम्ही मला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिलीत. यासाठी मी, माझे कुटुंबीय आणि लोकसभा क्षेत्र कायम तुमचे ऋणी राहू.” अशा आशयाचं ट्विट करुन रवी किशन यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रणौतला Y+ श्रेणीतील दिली होती.

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

काय म्हणाले होते रवी किशन?

“मी माझं वक्तव्य अत्यंत योग्य वेळी केलं आहे. मी ड्रग्ज विरोधात आवाज उठवला कारण मला सिनेसृष्टीतील तरुणांची काळजी वाटते आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीविषयीही काळजी वाटते आहे. मी माझ्या आयुष्याचा विचार अशा वेळी करत नाही. देशाच्या भविष्यासाठी गोळ्या झेलण्याचीही माझी तयारी आहे”, असं रवी किशन यांनी म्हटलं होतं. रवी किशन हे भाजपाचे गोरखपूरचे खासदार आहेत. त्यांना धमकी देणारे काही फोन कॉल्स आले होते. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी देशासाठी गोळ्या झेलायला तयार आहे असं म्हटलं होतं.