News Flash

गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं, कर्नाटक पोलिसांचं यश

दक्षिण अफ्रिकेत करण्यात आली होती अटक

साधारण १५ वर्षांपासून फरार असेल्या गँगस्टर रवी पुजारीला दक्षिण अफ्रिकेत अटक करण्यात आल्यानंतर त्याला रविवारी रात्री उशिरा भारतात आणण्यात आलं. सीबीआयची टीम रवी पुजारीला घेऊन भारतात आली होती. कर्नाटकातील एका गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बंगळुरुमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह २०० गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे त्याच्यावर आरोप आहेत. दक्षिण अफ्रिकेतील सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता. सीबीआय व ‘रॉ’ यांच्याकडून देखील रवी पुजारीची संयुक्त चौकशी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 2:29 pm

Web Title: ravi pujari reaches kempegowda international airport msr 87
Next Stories
1 शाहीन बाग प्रकरणी आजही निर्णय नाही; २६ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
2 Video: जुगाड फसलं! पृथ्वी सपाट आहे सिद्ध करण्याच्या नादात घरगुती रॉकेटनं केलं उड्डाण अन्…
3 साबरमती आश्रमातील त्या अभिप्राय नोंदवहीत ट्रम्प यांनी लिहिले…
Just Now!
X