22 September 2020

News Flash

भारत महिलांसाठी असुरक्षित देश असल्याचा अहवाल अमान्य- रविशंकर प्रसाद

भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचा थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनचा अहवाल त्यांनी फेटाळून लावला

| July 11, 2018 01:50 am

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

लंडन : महिलांच्या सुरक्षेबाबतचा कुठलाही प्रश्न हा दुर्दैवीच आहे, या सामाजिक प्रश्नाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे सांगितले. भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचा थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनचा अहवाल त्यांनी फेटाळून लावला. अफगाणिस्तान, सीरिया यांच्यानंतर भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश आहे, कारण तेथे मोठय़ा प्रमाणावर लैंगिक हिंसाचाराच्या घटना घडतात, असे या अहवालात म्हटले होते.

लंडनमधील आशिया हाऊस येथे भारतीय व्यावसायिकांच्या मंचापुढे बोलताना कायदा, न्याय व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की हा अहवाल भारतातील २००-३००महिलांशी बोलून केलेला आहे. भारताची लोकसंख्या १.३ अब्ज आहे. त्यामुळे त्यातील सर्वेक्षणाचा नमुना बघता विश्वासार्हता काहीच नाही. यात कुणा एका देशाला वेगळे पाडणे योग्य नाही. महिलांच्या सुरक्षेबाबतचा कुठलाही प्रश्न दुर्दैवी आहे, पण त्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करीत आहोत. आम्ही बलात्काराबाबत कायदा बदलून त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. युरोपीय समुदायाने महिलांच्या सुरक्षेबाबत एक अहवाल दिला आहे,त्यात युरोपचेही फार चांगले चित्र सामोरे आलेले नाही.

आमच्याकडे संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री तसेच संसदेच्या सभापती या महिलाच आहेत, ही दुसरी बाजू कुणी लक्षात घ्यायला तयार नाही ही शोकांतिका आहे. ब्रिटनच्या कंपन्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यात  थेट परदेशी गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वाढत आहे, त्यात अनेक संधी आहेत. डिजिटल सक्षमीकरण ही आता लोकचळवळ झाली आहे असे त्यांनी  स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:50 am

Web Title: ravi shankar prasad reject survey on women safety in india by thompson
Next Stories
1 पहिल्या शीख पोलीस अधिकाऱ्याला पाकिस्तानात अपमानास्पद वागणूक
2 काश्मीरवरील संयुक्त राष्ट्राच्या वादग्रस्त अहवालामागे पाकिस्तानी व्यक्तीचा हात
3 मजुरी मिळाली नाही म्हणून महिलांनी मुख्यमंत्र्यांचा बनवला ‘फुटबॉल’
Just Now!
X