01 December 2020

News Flash

बिहार निवडणूक : “धर्म, जातीपातीचं जाऊ द्या बेरोजगारीच्या प्रश्नावर या आणि…”

"आता तुम्हाला १० ते १५ हजार पगार मिळत आहे. जर तुम्ही अनेक वर्ष..."

बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा ठरत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेला १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपाने राज्यामध्ये १९ लाख नोकऱ्या देण्याचा शब्द दिला आहे. रोजगारासंदर्भात सुरु असणाऱ्या याच दाव्या प्रतिदाव्यांच्यादरम्यान पत्रकार रविश कुमार यांनी फेसबुकवर या विषयाबद्दल मतप्रदर्शन केलं आहे. धर्म, जात याबद्दल बोलण्याऐवजी बेरोजगारीच्या प्रश्नावर सर्व मतदारांनी एकत्र यावे, चर्चा करावी त्यामुळे नेत्यांवर दबाव निर्माण होईल. आपल्या कामाबद्दल इमानदार राहा. कामासोबत इमान कायम ठेवा, असं आवाहन रविश यांनी मतदारांना केलं आहे.

“नोकऱ्यांसंदर्भात वृत्तांकनामुळे रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण झाला आणि पीयुष गोयल यांनी रेल्वेभरतीसंदर्भात आश्वासन दिलं. असे अनेक लोकं आहेत ज्यांनी परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे मात्र त्यांचे प्रशिक्षण अद्याप सुरु झालेले नाही. तुम्ही मत कोणालाही द्या मात्र या मुद्द्यासोबत अन्याय करु नका,” अशी साद रविश कुमार यांनी तरुण मतदारांना घातली आहे. पुढे एका पुस्तकाचा संदर्भ देत रवी यांनी तीन प्रकारच्या नोकऱ्या असल्याचे सांगितले. स्वयंरोजगार, सरकारी नोकरी आणि खासगी नोकरी. “भारतातील सर्वाधिक लोकं स्वयंरोजगारामध्ये आहेत. असंघटित क्षेथ्रामध्ये ६५ टक्के स्वयंरोजगार करतात मात्र यांना कामाचा खूपच अल्प मोबदला मिळतो,” असं रविश म्हणाले.

“निर्मिती आणि बांधकामासारख्या क्षेत्रांमध्ये जिथे कुशल कामगारांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात नसते. मात्र २०१४ नंतर निर्यात कमी झाली आणि निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकही कमी झाली. बांधकाम क्षेत्रालाही त्याचा फटका बसला. आता या क्षेत्रांमध्ये पगारही नाही आणि रोजगारही नाही. कापड उद्योगालाही चांगलाच फटका बसला आहे. बक्सर, आरा, नालंदा, जमुई, दरभंगा येथील विद्यालयांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाहीय. आता तुम्हाला १० ते १५ हजार पगार मिळत आहे. जर तुम्ही अनेक वर्ष १५ हजार पगारावर काम करत असाल तर काम करत करतच तुम्ही गरीब व्हाल,” असं रविश म्हणाले.

आणखी वाचा- “रोजगारासाठी नाही तर हौस म्हणून बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात”

“नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखीन बिकट होऊ लागली. आता भारताकडील डेमोग्रॅफिक डिव्हिडंट संपत आला आहे. म्हणजेच कमाई वाढली मात्र बचत खूपच कमी झाली आहे. आता लोकं बेरोजगार म्हणूनच म्हतारपणामध्ये प्रवेश करतील. तुम्ही जे काम कराल ते ही पूर्ण क्षमतेने करता येणार नाही. सरकारने स्किल इंडिया कार्यक्रम चालवला मात्र एज्युकेशन इंडिया कार्यक्रम नाही चावला,” असं म्हणत रविश यांनी सरकारी धोरणांवर टीका केली.

देशातील तरुणांबरोबर मस्करी केली जात आहे असंही रविश म्हणाले. लोकांना थोडं फार काहीतरी मिळलं मात्र त्याच्या मोबदल्यात सारं काही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. सर्वच ठिकाणी तरुण वर्ग सरकारी नोकऱ्यांमुळे त्रासलेला आहे. मागील जूनमध्ये जे निकाल आले त्यावर आधारित भरती प्रक्रिया अद्यापही का झालेली नाही?, असा प्रश्न रविश यांनी उपस्थित केला. रविश यांनी खास भोजपुरी भाषेमध्ये लोकं जातीपातीच्या मागे लागले असून त्यांनी आधी नोकरीसंदर्भातील प्रश्नांवर उत्तर शोधण्याची गरज आहे असंही म्हटलं. नोकरीवर सर्वाधिक कार्यक्रम आपण केल्याचा दावा रविश यांनी केला. तसेच नोकरीसंदर्भातील प्रश्नाकडे अधिक व्यापकतेने पाहिलं जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र असं केलं नाही तर चांगलं आयुष्य जगता येणार नाही, असा इशाराही रविश यांनी बिहारच्या जनतेला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 1:57 pm

Web Title: ravish kumar says employment should be the prime concern in bihar election scsg 91
Next Stories
1 काश्मीर खोऱ्यात जवानांची धडाकेबाज कारवाई, या वर्षात ऑक्टोबरपर्यंत २०० दहशतवाद्यांचा खात्मा
2 स्मृती इराणी वि. काकोडकर : मोदी सरकारने कायद्याचे उल्लंघन करुन घेतला ‘तो’ निर्णय
3 हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप, तिघांना अटक
Just Now!
X