News Flash

रॉ, आयबीकडून IRS अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्टचे प्रशिक्षण

काय आहे इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्ट

रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो या भारताच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहेत. ‘रॉ’ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची तर आयबी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही संस्था सध्या इन्कम टॅक्स, अमलबजावणी संचलनालय म्हणजे इडी, महसूल गुप्तचर संचलनालय आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’चे प्रशिक्षण देत आहे. ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’ म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करुन, आधुनिक पद्धतीने हेरगिरी करण्याचे तंत्र आणि पद्धत.

गुप्त पद्धतीने माहिती गोळा करणे तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हाताळण्यात आयआरएस अधिकाऱ्यांना पारंगत करण्यासाठी खास नऊ कोर्सेसचे मॉड्युल बनवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भारतीय महसूल सेवेतील फक्त ग्रुप ए च्या अधिकाऱ्यांना रॉ च्या गुरगावमधील प्रशिक्षण केंद्रात तर आयबीच्या दिल्लीतील राष्ट्रीय गुप्तचर केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाचे CEIB समन्वयक म्हणून काम पाहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:59 pm

Web Title: raw ib training irs officers in intelligence tradecraft dmp 82
Next Stories
1 इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठे करता?; भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला
2 भयंकर! अल्पवयीन मुलीवर ७ जणांनी केला बलात्कार, आत्महत्या करत संपवलं जीवन
3 देशात २४ बोगस विद्यापीठं; नागपूरमधील एका विद्यापीठाचा समावेश, पाहा संपूर्ण यादी
Just Now!
X