News Flash

अजब प्रेमाची गजब गोष्ट : ती जेवण मागायला आली अन् अन्नदाता तिच्याच प्रेमात पडला…

Corona Volunteer: अन्नदानाचं पुण्य लगेच फळलं; मिळालं कन्यादान

करोना व्हायरसच्या प्रादुर्भव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना लग्न जमवताना अडचण निर्माण होत आहे. अशातच कानपूरमध्ये राहणाऱ्या अनिल आणि नीलमने सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. कानपूरमध्ये झालेलं हे लग्न उत्तर प्रदेशमध्ये सध्या चर्चेचा विषय असून नेटकरी दोघांचंही कौतुक करत आहेत. पाहूयात अनिल आणि नीलमच्या प्रेमाची अजब गोष्ट…

आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे नीलम भाऊ आणि वहिनीकडे राहत होती. कालांतराने नीलमकडून मोलकरीसारखं घरातील सर्व काम करून घेतलं जाऊ लागलं. छोट्या-छोट्या गोष्टीवरून तिला मारहाण होत होती. अखेर नीलमने घर सोडलं. असाहाय्य आणि निराधर झालेली नीलम कानपूरमधील काकादेव परिसरातील नीर-छीर चौकात असणाऱ्या भिखाऱ्यासोबत राहू लागली.

आधीच संकटात असणाऱ्या नीलमच्या आयुष्यात लॉकडाउननंतर आणखी संकट घेऊन आलं. पोटापुरती मिळणारं जेवणंही लॉकडाउनमुळे बंद झालं होतं. उपासमारीची वेळ आली होती. याचदरम्यान कानपूरमधील लालता प्रसाद यांची भेट नीलमसोबत झाली. लालता प्रसाद यांनी ड्राव्हर असणाऱ्या अनिलला नीलमसह इतरांनाही दररोज न चुकता जेवण देण्याचा आदेश दिला. सलग ४५ दिवस अनिल नीलमसह तेथे असणाऱ्या सर्वांना जेवण देत होता. याचदरम्यान नीलम आणि अनिलमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला.

हळूहळू दोघेही प्रेमात अखंड बुडाले आणि ही गोष्ट अनिलच्या वडिलांना समजली. अनिलच्या वडिलांनी नीलमसोबत लग्नाची बोलणी केली. लग्नाची विचारणा झाल्यानंत नीलमनेही झटक्यात होकार दिल. काही दिवसांत लगेच दोघांच्या सहमतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अनिल आणि नीलमचा विवाह झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 3:16 pm

Web Title: ray of love in coronavirus time volunteer guy falls in love with homeless and beggar girl couple gets married at kanpur in up nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘Gupta & Son’ नाही ‘Gupta & Daughters’… परंपरा मोडीत काढणाऱ्या मेडिकलवाल्यावर कौतुकाचा वर्षाव
2 जुना फोटो ट्विट करत अझरूद्दीनने सांगितली खास गोष्ट
3 Lockdown: भुकेने व्याकूळ झाल्याने रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचं मांस खाण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X